Help:एकीकृत प्रवेश
वैश्विक खात्याबद्दल
ते काय आहे
Wikimedia Foundation हे अनेक भाषांत, अनेक संपादण्याजोगे विकि चालविते. पारंपारिकरित्या, सदस्यांना प्रत्येक विकिवर वेगवेगळे सदस्य खाते तयार करावयास लागायचे. हे त्यांच्या अनेक विकिवरील सहभागास एक कठीण काम करीत होता, विशेषतः , जेंव्हा विकिमिडिया कॉमन्सने बहुमाध्यमांचे एकीकरण अधिक जरुरी केले व विकिडाटा हा आंतरविकि दुव्यांसाठी एक केंद्रीय विकि बनला.
आपले वैश्विक खाते आपले नाव सर्व विकिंवर आरक्षित करुन, या सर्व अडचणी सोडविते (जेणेकरुन कोणीही आपले नाव तोतयेगिरीने वापरु शकत नाही), व एखाद्या विकिवर जेथे आपण कधीही भेट दिली नाही, तेथे आपले स्थानिक सदस्य खाते आपोआप तयार करते.
तुमच्या जागतिक खात्याबद्दल तपशील पाहण्यासाठी तुम्ही Special:CentralAuth वापरू शकता. तुम्ही Special:Preferences वर कॉन्फिगर केलेला ईमेल पत्ता आणि पासवर्ड सर्व विकिंवर वापरला जाईल. याचा अर्थ असा की तुम्ही कोणत्याही सार्वजनिक विकिमीडिया प्रकल्पात फक्त एकाच वापरकर्तानाव आणि पासवर्डने लॉग इन करू शकाल.
ते काय बदलविते
कोणत्याही सार्वजनिक विकिमिडिया विकीवर आपले सदस्यनाव नोंदविल्याने ते नाव आपोआप सर्व विकिंवर आरक्षित होते, याचा अर्थ असा कि,वेगवेगळे सदस्य एकच विशिष्ट नाव हे वेगवेगळ्या विकिंवर नोंदवु शकत नाहीत. सदस्याने फक्त एकाच खात्यात त्याचा विपत्रपत्ता हा स्थापुन त्याची खात्री करायची.कोणत्याही विकिवर परवलीचा शब्द बदलविल्यास तो सर्व विकिंवर त्याप्रमाणे बदलविल्या जातो. Special:UserLogin हे सदस्यास सर्व एकीकृत विकिंवर एकाचवेळेस सनोंद प्रवेश करविते, व सनोंद प्रवेश पानावरुन ते पूर्ण प्रभारीत झाल्याशिवाय बाहेर जाण्याने प्रवेश अपूर्ण राहु शकतो (हे जावास्क्रिप्ट वापरते आणि म्हणजेच, सदस्य हा यशस्वीरित्या सर्व विकिंवर प्रवेशु शकत नाही).
सदस्याच्या सनोंद प्रवेशास, ते पहिल्यांदा त्या विकिस भेट देतील तेंव्हा, ते अतिरिक्त विकि जोडल्या जातील.उदाहरणार्थ,एक नेहमीचा कॉमन्स व जर्मन विकिपीडियाचा सदस्य, हा आपोआप इंग्लिश विकिबुक्स व प्रवेशु शकणार नाही, परंतु, त्या सदस्याने जर सनोंद प्रवेशित असतांना जर इंग्लिश विकिबुक्सला भेट दिली तर, ते आपोआप पुढे इंग्लिश विकिबुक्स वर सनोंद प्रवेश झालेले असतील.(आपण कोणत्या विकिवर सनोंद प्रवेशित असता हे येथे Special:CentralAuth बघा).
ते काय बदलवित नाही
- काही गोष्टी अजूनही स्थानिकच आहेत:
- सदस्य अधिकार हे बहुदा स्थानिकच असतात, याचा अर्थ असा कि, प्रशासकास प्रत्येक ठिकाणी प्रशासकिय पोहोच असू शकत नाही.वैश्विक गट जसे, वैश्विक रोलबॅक,वैश्विक प्रचालक,वैश्विक आंतरपृष्ठ संपादक व वैश्विक अंकपत्ता प्रतिबंधन सूट याची विनंती प्रतिपालकांना विनंत्या/वैश्विक परवानग्या येथे करता येईल.
- पसंतीक्रम स्थानिक असतो, जरी विपत्रपत्ता स्थापावा लागतो,तरी त्याची खात्री एकाच ठिकाणी करण्यात येते.आपण वेगवेगळ्या संकेतस्थळांवर वेगवेगळा पसंतीक्रम ठेऊ शकता.[1]
- ब्लॉक्स स्थानिक आहेत, म्हणजेच एका विकीवर तयार केलेले ब्लॉक वापरून वापरकर्ते इतर विकि संपादित करू शकतात, जोपर्यंत त्या विकीवर प्रशासकाने अन्यथा ब्लॉक केलेले नाही. तथापि, जर एखादे खाते जागतिकदृष्ट्या लॉक केलेले किंवा जागतिकदृष्ट्या ब्लॉक केलेले असेल, तर ते सर्व विकिंना लागू होते.
- सदस्य आताही दोन संकेतस्थळांवर वेगवेगळे नाव असलेली खाती वापरु शकतात; परंतु, ही दोन खाती एकाच वैश्विक खात्यास जोडली जाणार नाहीत.
- वैश्विक खाते प्रणाली ही खुल्या विकिमिडिया प्रकल्पांवरच उपलब्ध आहे. मिडियाविकि संचेतनावर चालणारी संकेतस्थळे पण ज्याचे चालन फाऊंडेशन करीत नाही, यावर वेगळी खाते प्रणाली असणे सुरु राहील.त्यांनी, सेंट्रलऑथ हे विस्तारक, जे एकीकृत प्रवेश प्रणालीसाठी जबाबदार आहे, उभारले तरीही.
विकिटेक
In February 2025, Wikitech was migrated to SUL. After the migration was complete, developer accounts are no longer required to edit pages on Wikitech.
वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न
माझ्या वैश्विक खात्याचे पुनर्नामाभिधान होऊ शकते काय?
होय. आपण हे आवेदन वापरुन आपण पुनर्नामाभिधानाची विनंती करु शकता किंवा प्रतिपालकास विनंत्या/सदस्यनाम बदल वर एक विनंती टाकू शकता, जेथे एखादा प्रतिपालक किंवा वैश्विक पुनर्नाम अधिकारी आपल्या विनंतीकडे बघेल. अधिक तपशिलासाठी, global rename policy हे बघा.
माझे दोन किंवा अधिक नावांनी खाते आहे. ते एकाच खात्यात समाविष्ट करता येईल काय?
जर ते वेगवेगळ्या विकींवर असतील, तर सैद्धांतिकदृष्ट्या त्यांना एका वैश्विक खात्यात सुसंगत नावाने विलीन करणे शक्य आहे, परंतु प्रक्रिया गुंतागुंतीची आणि क्वचितच केली जाते. जर ते एकाच विकीवर असतील, तर खाती विलीन करणे शक्य नाही.
इतर विकिंवर मला स्वयंशाबित स्थिती मिळेल काय?
नाही. आपणास स्वयंशाबीत स्थिती मिळण्यासाठी, प्रत्येक विशिष्ट विकिवर, योग्य वेळ येईपर्यंत थांबावे लागेल.
खाते-निर्माण-प्रतिबंधन विकिंवरील खाते मी विलीन करु शकतो काय?
नाही, हे शक्य नाही. फिशबोल आणि खाजगी विकी युनिफाइड लॉगिन सिस्टमचा भाग नाहीत आणि ते स्वतःचे वेगळे खाते वापरतात.
मी लॉग इन केल्यानंतर दुसऱ्या विकिमीडिया विकीवर माझे लॉगिन का अयशस्वी होते?
हे युनिफाइड लॉगिन सिस्टीमचे अपयश नाही, तर सामान्यतः तुमच्या लॉगिनसाठी सेट केलेल्या कुकीज मर्यादित करून लॉगिनला प्रतिबंधित करणाऱ्या ब्राउझरची ही संबंधित समस्या आहे.
प्रत्येक विकीच्या सिस्टर सेटचे बेस डोमेन नेम वेगवेगळे असते, उदा. wikipedia.org, wikimedia.org, wikisource.org, इत्यादी आणि कुकीज त्यानुसार सेट केल्या जातात हे लक्षात घेता. जर तुमचं लॉगिन सतत अयशस्वी होत असेल, तर तुम्ही Phabricator बग रिपोर्ट दाखल करण्याचा विचार करावा.