हार्डवेयर सहवापर कार्यक्रम

This page is a translated version of the page Hardware donation program and the translation is 90% complete.
Outdated translations are marked like this.

सारांश

ह्या पानावर विकिमिडीया प्रतिष्ठानच्या हार्डवेयर सहवापर कार्यक्रमाची माहिती दिली आहे, त्याचबरोबर ह्या कार्यक्रमात सहभागी कसे व्हायचे याचीही माहिती येथे दिलेले आहे.

सप्टेंबर २०१७ साली अंदाजे उपलब्ध असणारे लॅपटॉप:
~२
लॅपटॉपचे पुढचे वाटप बहुतांश यावेळी होईल :
Wiki Indaba 2023 (Agadir); Wikimedia Summit (Berlin)

कार्यक्रमाविषयी

विकिमिडीया प्रतिष्ठान आपल्या कार्यालयीन वापराचे संगणक काही काळानंतर निरुपयोगी ठरवते, आणि ते संगणक सहवापरासाठी देण्यासाठी नेहमीच इच्छूक असते. कारण, ते संगणक पुढील काही वर्षे नक्कीच वापरण्याजोगे असतात. त्यामुळे प्रतिष्ठानच्या ध्येयाशी जोडलेली ध्येये असणारे स्वयंसेवक नक्कीच ह्या कार्यक्रमाचा फ़ायदा घेऊ शकतात. हे लॅपटॉप सहसा "४ ते ६ वर्षे जुने" असतात. ह्या कार्यक्रमातून नवी उपकरणे उपलब्ध नसतात.

सहवापरासाठी देण्यात आलेले संगणक उबंटू प्रणालीच्या नव्या प्रस्थापनेसह(fresh installation of Ubuntu Linux), वैश्विक विद्युत जोडणी(Universal power adapter) सकट दिले जातात, त्यामुळे ते मिळणाऱ्या व्यक्तिला त्याचा वापर सहज शक्य होतो.

या खाली या कार्यक्रमातील वाटपाची चाचणी वर्षांसाठीची निवड प्रक्रिया दिलेली आहे.

आय टी आणि वित्तखात्याच्या प्रक्रिया ह्या अंतर्गत असतात आणि त्यांची नोंद येथे केली जात नाही. ह्या पानावर फक्त कोणाला हार्डवेयर सहाय्य मिळू शकते आणि ते कसे मिळू शकते याचीच माहिती मिळेल.

गुणवत्ता

आवश्यकता

हार्डवेयरची विनंती करताना, अर्जदारांनी (सदस्य गट आणि त्याच्याशी जोडलेले सदस्यसुद्धा) खालील अटींची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे :

  • अर्जदारांनी विकिमिडीया प्रकल्पांवर एक वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असणे आवश्यक आहे शिवाय त्यांनी १००० पेक्षा जास्त संपादने केलेली असावीत. या अटीचे कारण हेच आहे की, जेणेकरून आम्ही देत असलेल्या हार्डवेयरच्या सहाय्याने अर्जदार नक्कीच योगदान देतील आणि त्याचे प्रकल्पाला असलेली बांधिलकी आधीच प्रस्थापीत झालेली आहे. ही आवश्यक परंतू, सर्वोपरी नसलेली अट आहे, शिवाय संपादन संख्या अर्जदारांना कसलीही निश्चिती देत नाही.
  • अर्जदारांनी स्वत:ची ओळख विकिमिडीया प्रतिष्ठानला करून देणे आवश्यक राहिल आणि एक लहानसा करार त्यांनी त्यांना मिळणाऱ्या हार्डवेयरच्या वापराच्या बाबत करणे अपेक्षित आहे.
  • अर्जदार हे इराणचे नागरिक अथवा उनायटेड स्टेट कोषागाराच्या काळ्या यादीतील नसावेत.("Specially Designated Nationals"). विकीमीडिया फाऊंडेशन ही अमेरिकास्थित ना-नफा संस्था असल्याने दुर्दैवाने हा निर्णय विकिमीडियाचा नाही.

इतर लक्षात घेतल्या जाणाऱ्या बाबी

खालील काही बाबींमुळे तुम्हांला हार्डवेयर मिळण्याच्या शक्यता वाढू शकतात (पण मिळेलच याची काही निश्चिती नाही) :

  • अर्जदार कमी उत्पन्न गटाच्या देशातला असावा. उत्पनाचा कोणताही पुरावा मागितला जात नाही किंवा विचारातही घेतला जात नाही.
  • गटासाठी मागितलेल्या हार्डवेयरच्या वापराची एक निश्चित प्रक्रिया प्रस्थापित करणे आणि ती प्रत्यक्षात आणण्याची पूर्ण योजना पारदर्शीपणे दाखवणे आवश्यक आहे.
  • अर्जदार ज्यांनी आधी विकिमिडीया प्रतिष्ठानच्या संसाधनांचा(उदा, ग्रांट्स आणि शिष्यवृत्त्यांचा) योग्य आणि परिणामकारक वापर केलेला आहे.

प्रक्रिया

अर्ज करताना

लॅपटॉपच्या विनंतीसाठी तुमचे सदस्यनाव खालील चौकटीत भरा आणि लॅपटॉपची विनंती नोंदवा हे बटन दाबा, आणि नंतर उघडणारा अर्ज भरा.

एकदा तुम्ही तो अर्ज भरला की, इतर सदस्य तो अर्ज पाहून तुम्हाला समर्थन देतील, आणि तुमच्या अर्जावर मतेही मांडतील. इतरांकडून तुमच्या अर्जावर सक्रियपणे मते घेतली जाणार नाहीत तसेच या प्रक्रियेला कोणतीही कालमर्यादा ठरवलेली नाही.

जर खालील इनपुटबॉक्स तुमच्यासाठी काम करत नसेल, तर व्यक्तिचलितपणे हार्डवेअर सहवापर उपक्रम/YOUR_USERNAME ("YOUR_USERNAME" ऐवजी तुमच्या स्वतःच्या वापरकर्ता नावासह) नावाचे एक पृष्ठ तयार करा आणि त्यात हे पान आणि सेव्ह करा. त्यानंतर आपण परिणामी पृष्ठ संपादित करू शकता.


निर्णय-करणे

  • विकिमिडीया प्रतिष्ठानच्या समुदाय विकास गटाचे कार्यक्रम अधिकारी (जे सध्या Asaf Bartov) आहेत, ते अर्जांची तपासणी करून, अर्जांवर निर्णय घेतात. हे निर्णय वेळ मिळेल तसे वेळेनुसार(अगदी जास्तीत जास्त महिन्यातून एकदा) घेतले जातात.
  • तुमचा अर्ज स्वीकारला किंवा नाकारला जाऊ शकतो; कोणतीही शंका असल्यास, कार्यक्रम अधिकारी तुमच्याकडून जास्तीची माहिती विचारू शकतात, आणि तुमची विनंती पुढच्या वेळी पुन्हा विचारात घेतली जाऊ शकते. निर्णय विकास संसाधने कार्यक्रम अधिकारी यांचाच अंतीम मानला जातो त्यावर पुढे अर्ज/विनंत्या केल्या जाऊ शकत नाहीत.
  • जर तुमची विनंती वैध सिद्ध झाली तर, त्याची पूर्तता करण्याची शक्यता तपासली जाईल, की तुमच्या पर्यंत तुम्ही विनंती केलेले हार्डवेयर पोहोचवणे (किती सोपे/सहज/शक्य आहे). जर ते पोहोचवणे अशक्य असेल तुमचा अर्ज रद्द म्हणून ग्राह्य धरला जाईल.
  • एकदा का तुमची विनंती स्वीकारली गेली, त्या नंतर निर्णय जाहिररित्या मांडला जाईल, अर्जदारांना एक करारनामा पाठवला जाईल जो त्यांनी सही करुन परत पाठवणे बंधनकारक राहिल.
  • WMF च्या ऑफिस IT (OIT) टीमच्या वेळापत्रकानुसार, अतिरिक्त घसारा उपकरणे उपलब्ध झाल्यावर मंजूर देणग्या पूर्ण केल्या जातील या समजावर, देणगीसाठी कोणतीही उपकरणे उपलब्ध नसतानाही विनंत्यांचे पुनरावलोकन केले जाऊ शकते.

प्रत्यक्षात हातात मिळणे

एकदा करारपत्रावर स्वाक्षरी झाल्यानंतर, कार्यक्रम अधिकारी उपकरणे कशी वितरित करायची याविषयी एका खाजगी वाहिनीवर अर्जदारासोबत विशिष्ट व्यवस्था समन्वयित करतील. डिलिव्हरीची योग्य पद्धत ठरल्यानंतर, सीडी अधिकारी हार्डवेअर प्राप्त करण्यासाठी ओआयटीशी संपर्क साधेल आणि सहमतीनुसार ते वितरित करण्यासाठी पुढे जाईल.

  • खर्च कमी ठेवण्यासाठी, कुरिअर म्हणून सेवा देण्यास सहमत असलेल्या कर्मचार्‍यांद्वारे उपकरणे बहुतेकदा संधी परवाने म्हणून वितरीत केली जातील आणि ते अर्जदारांना भेटतील तेथे उपकरणे सोबत घेऊन जातील (उदा. विकिमेनिया, विकिमीडिया परिषद, प्रादेशिक परिषद ), किंवा त्यांचे देशबांधव (जर ते अर्जदारांना पूर्व व्यवस्थेद्वारे उपकरणे वितरीत करण्यास सहमत असतील तर).
  • उपकरणे पाठवणे 'शक्य आहे' जर खर्च खूपच कमी असेल 'आणि' सीमाशुल्क विलंब किंवा अतिरिक्त शुल्काचा धोका 'माहित' कमी असेल.
  • जर अर्जदार (किंवा त्यांचा प्रतिनिधी) उपस्थित राहण्यासाठी 'ज्ञात असेल, म्हणजेच व्हिसा मिळवला असेल आणि फ्लाइटचे तिकीट बुक केले असेल तरच कर्मचारी आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी उपकरणे आणतील.
  • या सर्वांचा अर्थ असा आहे की हे पूर्णपणे शक्य आहे की अत्यंत योग्य विनंत्या पूर्ण केल्या जाणार नाहीत कारण उपकरणे भौतिकरित्या वितरित करणे प्रतिबंधात्मक महाग असेल.

पुर्णत्व

उपकरणे वितरीत केल्यावर, अर्जदार विनंतीच्या विकी पृष्ठावर सार्वजनिकरित्या उपकरणे मिळाल्याची पुष्टी करतील. एकदा पुष्टी झाल्यानंतर, देणगी प्रभावी मानली जाते आणि बंद केली जाते.  दान केलेल्या हार्डवेअरच्या प्राप्तकर्त्यांना विनंती पृष्ठावर किंवा ब्लॉग किंवा सोशल मीडिया पोस्टमध्ये, विनंती पृष्ठावरून लिंक केलेल्या हार्डवेअरचा वापर रेकॉर्ड करण्यासाठी प्रोत्साहित' केले जाते, परंतु आवश्यक नाही.

असे दस्तऐवज इतर स्वयंसेवकांना हार्डवेअरची विनंती करण्यासाठी आणि WMF ऑफिस आयटी टीमला हे हार्डवेअर तयार करण्यासाठी आणि प्रदान करण्याचे काम सुरू ठेवण्यास प्रवृत्त करू शकतात.

<==सध्याच्या सहवापर विनंत्या==

सध्या मतदान चालू असलेल्या विनंत्या


अपूर्ण भरलेल्या विनंत्या


Declined requests


पारीत झालेल्या परंतू अजुनही हातात न पोहोचलेल्या विनंत्या


आधीच्या सहवापर विनंत्या

२०१६-२०१७ ह्या आर्थिक वर्षातील सहवापरास दिलेले हार्डवेयर


२०१७-२०१८ ह्या आर्थिक वर्षातील सहवापरास दिलेले हार्डवेयर


२०१८-२०१९ ह्या आर्थिक वर्षातील सहवापरास दिलेले हार्डवेयर


२०१९-२०२० ह्या आर्थिक वर्षातील सहवापरास दिलेले हार्डवेयर


Donated hardware in fiscal year 2020–2021

No pages meet these criteria.

Donated hardware in fiscal year 2021–2022

No pages meet these criteria.

Donated hardware in fiscal year 2022–2023

Donated hardware in fiscal year 2023–2024

Donated hardware in fiscal year 2024–2025

कार्यक्रम ठरवतानाचे मुळ नियम

प्राधान्यक्रम:

नियम #1: हा कार्यक्रम पुर्णपणे कमी खर्चात(सहभागी सदस्यांच्या वेळेची आणि पैश्याचीही बचत झाली पाहिजे) बसणारा असावा.

नियम #२: ह्या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की, ज्यांना त्या हार्डवेयरची गरज आहे त्यांच्या पर्यंत ते पोहोचवले जावे. आणि त्या हार्डवेयरचा वापर पुढे विकिमिडीया चळवळीच्या उद्देशांच्या पुर्ततेसाठी व्हावा.

नियम #३: वितरण जितके शक्य होईल तितके, व्याहरिक, जास्तीत जास्त नि:पक्ष" असावे. यामूळे कदाचित सर्वच लोकांना हार्डवेयर मिळणे शक्य होणार नाही पण समान संधी नक्कीच निर्माण होतील, आणि त्यातून नियम #१ आणि #२ चा सन्मान.

नियम #४: या कार्यक्रमाची रचना कोणत्याही तातडीच्या उद्देशांची पुर्तता करण्यासाठी केली गेलेली नाही. जर एखाद्या निश्चित वेळेच्या अवधीमध्ये पूर्ण होणाऱ्या उद्देशांची पुर्तता करण्यासाठी जर एखादे हार्डवेयर हवे असेल तर, त्या प्रकारच्या ग्रांट कार्यक्रमांतर्गत त्याची मागणी नोंदवावी जेणेकरून ती कदाचित वेळेत पुर्ण होण्याची शक्यता वाढेल. नियम #१ मुळे अनेकदा हार्डवेयर पारीत होऊनही प्रत्यक्ष हातात मिळायला वेळ लागू शकेल किंवा कदाचित ते मिळण्याच्या शक्यता खूप उशीरावर जातीलही.

मूल्यमापन

हे ही बघा